page mira cuckold bring on creamy jizz.

प्रभावी शिक्षकाचे प्रमुख गुण

मूळ लेख  Top Qualities of Effective Teacher (http://rupeshghagi.com/top-qualities-of-effective-teacher/)  चे चैताली दंदेशरद कळस्कर यांनी केलेले भाषांतर.

एक  प्रभावी शिक्षकाचे उत्कृष्ट गुणविशेष काय आहेत? कोणत्या गोष्टी त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते?  हे प्रश्न आम्ही दिशा एज्यु पॉइंट येथे दिनांक ०८ मे २०१८ ला झालेल्या शिक्षकांच्या सभेत चर्चेला घेतले आणि मी या ठिकाणी त्यासंबंधी महत्त्वाचे मुद्दे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहो.

शिक्षक हे राष्ट्राच्या निर्मितीचे आधारस्तंभ आहेत कारण आपण भविष्यातील नागरिक, तंत्रज्ञ. वैज्ञानिक सनदी नौकर, राजकारणी आणि व्यवस्थेतील इतर सर्व घटकांना आकर देतो. त्यासाठी आम्ही सर्व शिक्षकांनी अत्यंत सुष्म पद्धतीने जास्तीत जास्त प्रभाव निर्माण करण्यासाठी आमची कौशल्य वृद्धिगत व धारधार केली पाहिजे. म्हणून प्रभावी शिक्षक होण्यासाठी काय गुणविशेष असले पाहिजे किंवा मिळविण्याच्या प्रयत्न केला पाहिजे,  ते सांगण्याचा मी  प्रयत्न करीत आहो.

१) शिक्षक हा विद्यार्थ्यांना दडपणातून मुक्त करून त्यांना सहज करण्यास समर्थ असला पाहिजे. ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वास शिक्षकांना वर्गात व वर्गाबाहेर सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करतो. लक्षात ठेवा अभ्यासतंत्र तेव्हाच जास्त फायद्याचे असते जेव्हा प्रत्येक जण त्यात कोणत्याही दबाव न येता सहभागी असतो. विद्यार्थ्यांना शिक्षकात मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक सापडला पाहिजे.

२) शिक्षकाने व्यक्तिशः प्रत्येक विद्यार्थ्यांचा आदर केला पाहिजे. तसेच जेव्हा केव्हा आपण विद्यार्थ्यांशी संवाद करतो तेव्हा आम्हाला आमच्या मर्यादा समजवणे गरजेचे असते. आपले  प्रयत्न विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्यासाठी, अन्तर्मुख होऊन स्वतःच्या चुका ओळखून त्या सुधारण्याची क्षमता त्यांच्यात यावी  यासाठी असावे.

३) शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व काळजी घेणारे व दयाळू असले पाहिजे. शिक्षकांनी मेहनती, सहनशील व सहानुभूतिपूर्ण असावे. ते सहनशिल श्रोते असावे. तुम्ही जेव्हा जबरदस्तीने बळजबरीने बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करता तसे क्वचितच घडते पण त्यामुळे संवादाची साखळी सुद्धा भंग पावतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चर्चा करण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी अणि असहमती दर्शविण्यासाठीसुद्धा उत्तेजन दिले पाहिजे.

४) एक उत्तम शिक्षक नेहमी शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचा मार्ग शोधत असतो. उदाहरणे कथा, विनोद, प्रात्यक्षिक इ.  अनेक साधने उपलब्ध आहेत. शिक्षकाने त्यांचा योग्य पध्दतीने वापर करावा.

५) शिक्षक चांगला संप्रेरक असावा. अवाजाचा चढउतार आपला मुद्दा प्रभावीपणे मांडण्यासाठी सहाय्यभूत ठरतो. परंतु घटक, सामग्री, शब्दांची  निवड, लहान सोपी वाक्ये आणखी जास्त महत्वाची आहेत शेवटी आपले ध्येय विद्यार्थांना शिकण्यासाठी मदत करणे आहे, त्यांना प्रभावित करणे नाही.

६) शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भावनिक आणि मानसिक क्षमतेची जाणिव असावी. शिक्षक लाजाळू विद्यार्थ्यांसोबतही योग्य संवाद साधण्यास आणि त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास सक्षम असावा. भावनिक स्थिती हाताळण्याची विद्यार्थ्याची क्षमता त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर प्रभाव पाडते. शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेनुसार अध्यापनाची दिशा ठरवावी. प्रत्येक मुल वेगळे आहे. आपण जर त्याला समजून घेवू शकलो व त्याच्या शिक्षणविषयक गरजा ध्यानात घेवून शिकविण्याचा प्रयत्न केला तर शिक्षक आपले कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पडू शकतात.

७) शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून उच्च अपेक्षा ठेवाव्या. विद्यार्थ्यानाही आधिक  उत्तम शिकण्यासाठी व स्वत:कडून उच्च अपेक्षा ठेवून प्रयत्न करण्याचे वळण लावावे. उच्च अपेक्षा आणि स्वत: ठरविलेले ध्येय्य विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात.

८) शिक्षकाला त्याच्या विषयाचे परिपूर्ण आणि अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक आहे. ते शिकविण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास व चिंतन करीत असावेत. त्यांनी वर्गात व वर्गाबाहेर करता येणाऱ्या व्याख्यान/प्रात्यक्षिक/चर्चा/उपक्रम अशा अनेक माध्यमांतून परिपूर्ण असा शैक्षणिक अनुभव तयार करावा.

९) शिक्षकाचे आपल्या कामाप्रती उत्कट प्रेम असले पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाप्रती समर्पण तुमच्यातील शिक्षकाला अधिक उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरित करत. त्यातून तुम्ही स्वत:वर मेहनत घेवून अधिक उत्तम शिक्षक बनण्यासाठी प्रयत्नशील राहता.

१०) स्वत:साठी वेळ द्या. वाचन करा. इतरांकडून शिका. चागले शिक्षक होण्यासाठी तुम्ही एक चांगले विद्यार्थी असणे आवश्यक आहे. शिकण्या-शिकविण्याच्या नव-नवीन पद्धती शोधात राहा.

Write. I would love to hear your views.

amatoriale napoli erster blowjob.pornoxo mobile