काही मनांत ज्योत पेटावी म्हणून…

जगण्याला धार असली पाहीजे,

कड्यावरून कोसळणाऱ्या पाण्यासारखी,

पाजवलेल्या पात्यासारखी,

किंवा

ताज्या खोल जखमेतून उसळणाऱ्या,

उष्ण रक्तासारखी,

आवेग,

कुठल्यातरी कारणानं,

हृदय कायम ढोल बडवत असलं पाहीजे,

अण्,

छातीचा भाता,

शब्दांनी, श्वासांनी,

कायम पेटवत असला पाहीजे,

पेटत असला पाहीजे,

जग जाळण्याठी नव्हे,

काही मनांत ज्योत पेटावी म्हणून…

Write. I would love to hear your views.