कशी वाढवावी मुलांची बुध्दिमत्ता?

दोघी सासवा – सुना,
दोघी माय – लेकी,
दोघी नंदा, भावजा,

तीन वडे,
वाटणी का पडे?

अगदी एकदोन आठवड्यांपूर्वी आईने आम्हाला हे कोडं घातलं. मुलांचे संगोपन हा विषय सांगताना माझ्या आईचा एक विशेष प्रयत्न नेहमी आठवणीत असतो तो म्हणजे हा. Critical Thinking Ability वाढविण्याचा. तिला माझ्या शाळेचा अभ्यास नाही घेता यायचा, परंतु ते तिचं काम नव्हतंच. परंतु तिने नेमकं ते केलं जे शाळेतून मला मिळालं नसतं.

आईनी बुद्धीला धार लावली आणि मोकळा श्वास घेवू दिला,
अभ्यासाच्या ताणामुळे वडिलांना आग्रह करून मला वेगळ्या शाळेत घातलं,
मला प्रेरित केलं, अभ्यासाचा विट येवू दिला नाही,
अगदी लहान असतानापासून कल्पनेच्या जगात खेळ रचू दिले,

तथ्य बदलतात. त्यांचा अभ्यास विद्यार्थ्याला तितका कामात येत नाही जेवढा विचारक्षमतेचा येतो. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्याची कुवत निर्माण होते.

शाळा आणि अभ्यास आणि शिक्षणाच्या दिखावेबाज इव्हेंट्स मूळे, महत्वाच्या सहजपणे शक्य असणाऱ्या परिणामकारक गोष्टी सुटून जात आहेत. Critikal thinking, reading, imagination, creativity,…. (मुलांसाठी याचे कोर्सेस कुठे होतात हे विचारू नका. ही तुम्ही करायची गोष्ट आहे.)

आणखी काय लिहू? भरपूर बोलायचं तुमच्याशी. भेटून बोलुयात.

(मुलांचे संगोपन या विषयावर अधिक जाणून घ्यायचे असेल तर या वेबसाईट ला follow करा. )

3 comments

  1. Pallavi · August 24

    absolutely right

  2. Sujata · August 24

    Nice writing da…..it’s true without mother’s support no one can do anything

Write. I would love to hear your views.